A recitation of Bhalchandra Nemade’s (डॉ. भालचंद्र नेमाडे) breathtaking poem ‘He lamb lamb raste…'(हे लांब लांब रस्ते ) This poem is featured in the beautiful Marathi film called ‘Trijya’ directed by Akshay Indikar.
The profound emptiness and rootlessness of this poem is hard hitting! I have revisited this poem multiple times in the last 1 year or so, and each time the words have presented me with a different, more deeper meanings and interpretations. It seems every-time I read this poem it opens up (to me) like the fragile petals of a flower, layer by layer, delicately yet never letting go of the weight that lies at its core.
The words are accompanied by original visuals captured by me. 🙂
Bhalchandra Vanaji Nemade is an Indian Marathi language writer, poet, critic and linguistic scholar. Beginning with his debut novel Kosala, Nemade brought new dimensions to the world of Marathi literature. This was followed by a tetralogy consisting of novels Bidhar, Hool, Jareela and Jhool. (Source: Wikipedia)
Trijya (2019) traces the journey of Avdhut, from his hometown in rural India and how he faces the reality of his own dreams and aspirations about life in a large Indian city. It takes us through the challenges of today’s modern way of life and the compromises one inevitably makes along the way to find peace and a place we can call our own. (Source: IMDb)
Performed, shot & edited by Shruti Ranavade.
Read the complete poem below.
हे लांब लांब रस्ते…
हे लांब लांब रस्ते कधी जुने होत नाहीत की बदलत नाहीत
आणि अंधाराच्या ढिगाऱ्यावरून धावत जातात दिवस कायम जिकडे पाहावं तिकडे तेच दिसेल असं नक्षत्र नाही,
नाही पृथ्वीलाही ठिकाणा भिरभिरून अंतराळात
तरी गुरुत्वाकर्षण नाहीसं करता येत नाही तिरडीवरसुद्धा
खुणा ठेवून संपत नाहीत चंद्रकोरी घराघरावर कललेल्या,
की सावल्या सोडून जात नाहीत झाडांना जन्मभर
लकाक्कन् उमटलेली टिकत नाहीत सूर्यबिंब संध्याकाळपर्यंतसुद्धा गालावरची
घरात शिरून दारं बंद केली तरी डोळे मिटले तरी आतली निगेटिव संपत नाही
असतेच असते सदानकदा अंगाचा रंग बदलत नाही की हाताची अडगळ सुटत नाही झोपेतसुद्धा
की त्यांच्याशिवायही आधी सकाळी असतात आमच्या दाट आतासारख्याच ढगाळ झोपेच्या
की दुसऱ्या कुणाच्याही हाताला त्यांची शरीरं
इतकीच हलकी वाटतात घामाचा वास गोड वाटतो.
की दुसऱ्या कुणापासूनही त्यांना तितकीच लाडकी पोरं होतात
की वासनेला दारं नाहीत, दरवाजे नाहीत,
आहेत भुयारं तळघरं की चाफ्याला अंगावरच फुलं फुटतात तसं त्यांच्याजवळ काही नाही
आमच्याजवळ तरी कुठे आहे. आहे जुनं धुऊन स्वच्छ राखलेलं कमीजास्त केसांचं कातडं.
नेहमी तडा जाऊन पुन्हा भिजणारी माती आपली नाही
की चेहरे कधी कधी लक्षात राहातच नाहीत
अस्पष्ट राहातात जन्मभर की त्यांना जवळ घेतांना कितीतरी गोष्टी जवळ घ्याव्या लागतात
लपेटून सापासारख्या किंवा शिरून भविष्यकाळातल्या अरण्यात
सुरक्षित भिंतीचं वचन द्यावं लागतं त्यांच्या कुडीला
घराचा मध्यबिंदु मान्य करून वर्तुळ आखून जन्माचं आहे तोपर्यंत.
त्याच त्याच पुन्हा वैरी झालेल्या रस्त्यांची सोबत
ढिगासारख्या रोज दारात वाट पाहणाऱ्या अंधाराची.
प्रिय रस्ते! प्रिय अंधार! आणि अंधाराला गिरक्या घालून दाराआड बसणाऱ्या रातकिड्यांची आणि नियमित वळणांची आणि पायांची आणि हॉटेलं बिलं पानांची
दुकानं पिचकाऱ्या. प्रिय तंबाखू !
आणि आकाशाला चिमटत राहाणारी टायरची जाहिरात. प्रिय जाहिराती !
निमूटपणे असतात बसतात चालू लागतात दिवस अजून
एखादा दिवस नागासारखा फणा उभारील आणि उभा राहील समोर म्हणून या चंद्रकोरी नीट लक्षात ठेव
पुन्हा कधीतरी आठवतील तुला.
मान फिरवली आणि जाण्यायेण्याचे रस्ते टाळले
गावं सोडली
तरी मोकळे होणार नाहीत
तरीसुद्धा रस्ते. विचित्र असतात रस्ते विचित्र असतात
घडणाऱ्या गोष्टी. खोट्या असतात पापण्या
माहीत नसतं काहीच माहीत नसतं की
सांगता येत नाही काही सगळंच नंतरसुद्धा
आणि खणूनही टाकता येत नाही हे सगळं
जिथे पाय टाकला तिथे भिंत उभी राहिली
चांगलं म्हटलं ते वाईट निघालं आणि वाईट काही नव्हतंच
ज्याला जे म्हटलं ते चुकीचंच होतं
नको ते मिळत गेलं आणि हवं ते चुकत गेलं
काय म्हटलं माहीत नाही काय राहिलं माहीत नाही. माहीत नाही कुणासाठी कशासाठी पुढेमागे अवतीभोवती काही नाही.
नकाशासारखी मागची गावं. घरं. रस्ते.
मागचं हे इतकं सगळं आणि आकाशासारखं फटफटीत पुढच आयुष्य.
काही हरवलं नाही काही सापडणार नाही. सावरून ठेवलं फक्त सहा फुटांचं शरीर.
थंडीत कुडकुडत तंबोऱ्यावर गारठलेली बोटं फिरवत कळवळून गाणाऱ्या भिकाऱ्याच्या चेहऱ्यावर
आणि त्याचा एक हात खांद्यावर घेऊन निर्विकार उभ्या पोरीच्या सुकलेल्या गालफडांवर सगळ्या कलांचा बोळा करून ओवाळला
सगळे धर्म सगळी मूल्यं तंबाखूच्या पिचकारीत थुंकली.
थकून गेले विचार पुढचं मागचं काही आवडीचं पाहता पाहता सगळं तात्पुरतं, वेगळं आणि चांदण्यासारखं उन्हासारखं
पुन्हा जवळ येऊन नाहीसं होणारं
हे आपलं नशीब आहे. एकेकाच्या आत
असं रसायन असतं, बाहेरची हवा लागली
की त्याचा भडका होतो. नाइलाज नाइलाज.
कधीच कळलं नाही कशाकरता कशाकरता हे सगळं
सगळ्या गोष्टी अवेळी घडणाऱ्या
म्हणून सगळेजण खेकसत आलो पूर्वीपासून कशावर तरी गेले बिचारे
दुसरं काहीच नाही कुठे ह्या कोलाहलाशिवाय.
जे काही केलं त्याचा तमाशा झाला
आणि तमाशा केला तेव्हा लोक ओ हो ! ओ हो ! म्हणाले.
ऐसा क्यूं ऐसा क्यूं सैगलनं आधीच विचारून ठेवलं
कधीच कळलं नाही.
संध्याकाळी गावात फटका मारला कित्येक महिन्यांनी हजार माणसं समोरून येऊन मागे गेली पण
एकही ओळखीचा नाही, ओळखीचे लोक दुसऱ्या गावीच राहिले आता मीच कुणाच्या ओळखीचा नाही
गावं गजबजून उठतात सगळी एकदम
आणि ह्या रस्त्यावरही धरणीकंप जाणवतो
आरसे उलटेसुलटे डोक्यात फिरतात
ह्या तडतडणाऱ्या रस्त्यावर
हेही गाव असंच गजबजेल पुढे दुसऱ्या गावी
एकाच जन्मात पुनर्जन्म भोगण्याचं अद्भुत सुख
सगळ्या गोष्टींचा बरेवाईटपणा सुटतो, लहानमोठेपणा सुटतो
तरी पण आता हे कुरवाळून घे पुन्हा पुन्हा
थोड्याशा गोड गोष्टी तुझ्याशिवायही ह्या राहातील इथे
पण तुझ्याकरता आता आहेत ह्या. प्रिय गोष्टी.
विसरू नकोस स्मरण आहे तुझ्यात तोपर्यंत तरी
त्यानंतरचं तुला कोणी विचारत नाही. तोपर्यंतचंच.
आपण गेल्यानंतरसुद्धा आपल्या प्रिय गोष्टी इथेच राहतात हेही काय कमी आहे ?
त्यानंतर एकाएकी
कुणीतरी कुणासाठीतरी बांधलेला मुकबरा दिमाखात हसला
जणू आपल्यासाठी कुणी तरी आधीच बांधून ठेवला होता नाहीतर आपण कुठे काय स्मारकं बांधणार कुणाची ?
आणि कशाकशाची बांधणार आणि कुठे बांधणार ?
मांसाच्या दिशाशून्य आवरणात गुंडाळलेल्या तुझ्या बाळाला शिकवून ठेव पोटातलं कोट्यवधी पिढ्यांचं नातं
तो जन्मतांना तुला कमी वेणा होवो
सगळे अवयव नीट असो आतले बाहेरचे
तंबाखू खाण्यासाठी मजबूत दात असो जगावर थुंकण्यासाठी
सिगरेटसाठी मजबूत फुफ्फुसं आणि दारूसाठी पक्की लिव्हर
बुद्धी असो अपयशाचे फटके सोसण्याइतकी
समजअसो वडीलधारे सहन करण्याइतकी
पौरुष असो बायको नांदवण्याइतकं
नाही तर निरर्थक आहेत कित्येक जन्म सगळीकडे ह्यांवाचून
निरर्थक नसो बाळाची नाळ
बाहेर काळ मोठा कठीण आहे.
दुःखाचा अंकुश असो सदा मनावर
हलाहल पचवल्याबद्दल माथ्यावर चंद्र असो
चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोटं असोत
लक्षात राहात नाहीत बिचारी. त्यांना दीर्घायुष्य लाभो
ते चुलीपुढे बसून ताटात वाढलेलं मुकाट्यानं खातात
त्यांचे सदरे फाटके असतात आणि मुडपून टीप घातलेली असते धोतराला कुठेतरी
खिन्न असतात नेहमी नेहमी झोपेतसुद्धा ते कधी स्वतःचं अस्तित्व जाणवून देत नाहीत खंगलेले असतात
ते मनातच पिटाळून लावतात रानडुकरांएवढे विचारांचे कळप
शेवटचे राजे असतात बुरुजावरून खिन्नपणे क्षितिज न्याहाळत,
पागेतल्या म्हाताऱ्या घोडदळाची फुरफुर ऐकत
किंवा ते कधी समोरून जातांना दिसत नाहीत पण नंतर पाठमोरे दिसतात.
झोपलेले असतांना किती बिचारे दिसतात
पोरांना सडकेच्या काठावर ठेवून खडीडांबर टाकत असतात किंवा कुणी काहीही म्हटलं तरी ते हो हो म्हणतात.

Why The Black Bored? Why Art?
Now more than ever we need Art. Technologically these are the most craziest and dizzying times. The threat of all of us moving away from each other is real.